Posts

मराठी कविता | लळा

नातं

नातं

जिथे होतेय माणुसकीची कदर
तिथे मला विसावायचं आहे.

साय्रा जगाला मायेच्या पंखात
घेण्यासारखं नातं मला जोडायचं आहे.

राबनाय्रा हाताला साथ -
आजारी मातेला हात द्यायचा आहे.

दुखी-वंचित मुलांना सत्याच्या शाळेत सोडून
पोरक्या आसवांना ममत्व द्यायचं आहे.

कि जे सुख -दुखात समिलणारं-
कुणीही मायेनं जोपासणारं माणुसकीचं नातं मला जोडायचं आहे …।


                                              पांडुरंग वाघमोडे (जत,जि.सांगली)

II सजन माझा II

II सजन माझा II

सांज  बाई
बुडुनी  गेली
स्वयंपाक सारा
करुनी झाला

गेला कुठे
सजन माझा?
रोज येतो
नाही आला .

वाट पाहत
दारात उभी
कधी येतो?
चिंता कपाळी.

कुत्राही  बाई
नाही झेपावला
निपचित दारात
पडून राहिला.

काळीज माझं
चिरू लागलं
काय केल्या
मन गळालं

कधी आला
कुठे कळालं
पदरात रडू
गेली झोपाई.

कुशीत शिरुनी
आसवे पुसाली
जाग नाही
आली सकाळी …।


 पांडुरंग वाघमोडे (जत जि.सांगली)

आई तू गेल्यावरच

आई तू गेल्यावरच का गं हे सगळं  व्हावं,आत्ता बालपणीच्या मनाला बहर यावा -नि त्यावेळचं क्रोधी मन खाक  व्हावं. 
आई का गं माझ्या उदासवृत्तीतच उमटूनि दिसती ठसे,सांग तुझ्या  हृदयरुपी मनात गं कित्ती मने ? 
सांग आता आई तुजविना कसे वाटेल गं मला हायसे,मग तुजविना या जीवावर उदार का व्हायचे ?
आई कधीच न लागणार मजला संसाराची भूक,असून गं नसल्यापरी चरणात माझे मन मूक .
त्यावेळचं माझं मलाच गोंजरणारं मन  का गं दूर जावं ? मग तू नसल्यापरी या जीवाची घालमेल का गं व्हावी .

आई हृदयात दगदग फार मनाची,तुझ्याकडे धाव घ्यायची मग ती सानुली असो वा छकुला  तिच्या आईकडेच सोडून द्यायची .                                                                                                                                                               पांडुरंग वाघमोडे (जत जि.सांगली

PANDURANG WAGHAMODE: II लहानपणातली आठवण II

II लहानपणातली आठवण II

Image