Posts

Showing posts from March, 2014

नातं

        नातं जिथे होतेय माणुसकीची कदर तिथे मला विसावायचं आहे. साय्रा जगाला मायेच्या पंखात घेण्यासारखं नातं मला जोडायचं आहे. राबनाय्रा हाताला साथ - आजारी मातेला हात द्यायचा आहे. दुखी-वंचित मुलांना सत्याच्या शाळेत सोडून पोरक्या आसवांना ममत्व द्यायचं आहे. कि जे सुख -दुखात समिलणारं- कुणीही मायेनं जोपासणारं माणुसकीचं नातं मला जोडायचं आहे …।                                                                                       पांडुरंग वाघमोडे (जत,जि.सांगली)

II सजन माझा II

II सजन माझा II सांज  बाई बुडुनी  गेली स्वयंपाक सारा करुनी झाला गेला कुठे सजन माझा? रोज येतो नाही आला . वाट पाहत दारात उभी कधी येतो? चिंता कपाळी. कुत्राही  बाई नाही झेपावला निपचित दारात पडून राहिला. काळीज माझं चिरू लागलं काय केल्या मन गळालं कधी आला कुठे कळालं पदरात रडू गेली झोपाई. कुशीत शिरुनी आसवे पुसाली जाग नाही आली सकाळी …।  पांडुरंग वाघमोडे (जत जि.सांगली)

आई तू गेल्यावरच

आई तू गेल्यावरच का गं हे सगळं  व्हावं, आत्ता बालपणीच्या मनाला बहर यावा  -नि त्यावेळचं क्रोधी मन खाक  व्हावं.  आई का गं माझ्या उदासवृत्तीतच उमटूनि दिसती ठसे, सांग तुझ्या  हृदयरुपी मनात गं कित्ती मने ?  सांग आता आई तुजविना कसे वाटेल गं मला हायसे, मग तुजविना या जीवावर उदार का व्हायचे ? आई कधीच न लागणार मजला संसाराची भूक, असून गं नसल्यापरी चरणात माझे मन मूक . त्यावेळचं माझं मलाच गोंजरणारं मन  का गं दूर जावं ?  मग तू नसल्यापरी या जीवाची घालमेल का गं व्हावी . आई हृदयात दगदग फार मनाची,तुझ्याकडे धाव घ्यायची  मग ती सानुली असो वा छकुला  तिच्या आईकडेच सोडून द्यायची .                                                                                                                                                                पांडुरंग वाघमोडे (जत जि.सांगली

PANDURANG WAGHAMODE: II लहानपणातली आठवण II

PANDURANG WAGHAMODE: II लहानपणातली आठवण II

II लहानपणातली आठवण II

Image
Image
II गारपीठा II अजूनही इथं भयाण होतं रोजचं जगणं जड होतं  झोपलेल्या स्वप्नानां जागे करून थेंब थेंब पाणी दिलं होतं . स्वप्नांचा   चुराडा झाला होता , केसर आंबा ,द्राक्ष , गहू,  हर्बर्यांचा जमिनीवर  सडा अंतरला होता.  यामुळे राजकारण्यांचेही भले झाले होते. ऐन मोक्याच्या भरात लोकसभेच्या दारात बळीराजाच्या डोळ्या आसवे आणणारे मुद्द्ये मिळाले होते बळीराजाच्या रानात मनात नसुनही जात होते डोळ्या रुमाल लावून कळवळा दाखवत होते मात्र माझ्या राजाचे स्वप्न भग्न झाले होते दिवसरात्र कष्ट करून हिरव्यागार फुलवलेल्या बागा हातात मिळण्या आधीच गारपीटानं जमिनीतच थिजवल्या होत्या आत्ता कुठे माझा बळीराजा स्वप्नांना जागत होता गारपीठा तू आत्ताच कसा कोपला होतास तू येण्यानं माझा बळीराजा स्वप्नातच कोमेजला होता . पांडुरंग वाघमोडे (जत ,सांगली )

"प्रेमळ झाड "

Image

माणसं

         मनाला गारवा देणारी  देवारयाच्या गाभार्यात पूजन्यालायक  माणसं मला भेटली होती. कुंटुंबवात्सल्य  जपणारी दूरचा असूनही  जवळ करणारी  माणसं मला भेटली होती.  हितचिंतकासारखी माझी वाट बघणारी  परका असूनही जवळ चा  मानणारी  माणसं मला भेटली होती. मनात असूनही त्यांच्याबद्दल बोलण्यास; कधी  बोललोच नाही अन मजबद्दल मात्र  विचारपूस करणारी   माणसं मला भेटली होती. पांडुरंग वाघमोडे (रेवनाळ ता.जत जि.सांगली http://pandurangwaghamode.blogspot.com/2014/03/blog-post_4.html