II गारपीठा II

अजूनही इथं भयाण होतं
रोजचं जगणं जड होतं 
झोपलेल्या स्वप्नानां जागे करून
थेंब थेंब पाणी दिलं होतं .

स्वप्नांचा  चुराडा झाला होता ,
केसर आंबा ,द्राक्ष , गहू, 
हर्बर्यांचा जमिनीवर 
सडा अंतरला होता. 

यामुळे राजकारण्यांचेही
भले झाले होते.
ऐन मोक्याच्या भरात
लोकसभेच्या दारात
बळीराजाच्या डोळ्या
आसवे आणणारे मुद्द्ये मिळाले होते

बळीराजाच्या रानात
मनात नसुनही जात होते
डोळ्या रुमाल लावून
कळवळा दाखवत होते
मात्र माझ्या राजाचे स्वप्न भग्न झाले होते

दिवसरात्र कष्ट करून
हिरव्यागार फुलवलेल्या बागा
हातात मिळण्या आधीच
गारपीटानं जमिनीतच थिजवल्या होत्या

आत्ता कुठे माझा बळीराजा
स्वप्नांना जागत होता
गारपीठा तू आत्ताच कसा कोपला होतास
तू येण्यानं माझा बळीराजा स्वप्नातच कोमेजला होता .

पांडुरंग वाघमोडे (जत ,सांगली )


Comments

Popular posts from this blog

आई तू गेल्यावरच

माणसं